गाळेधारकांची निदर्शने सुरूच

0
31

गोवा विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बांबोळी येथील रस्ता रुंदीकरणासाठी हटविण्यात आलेल्या गाळ्यांचे आठ दिवसांत पुर्नवसन करण्याचे आश्‍वासन सोमवारी १८ ऑक्टोबरला विधानसभेत दिले होते. तरीही गाळेधारकांनी मंगळवार दि. १९ ऑक्टोबरला शांततेत निदर्शने सुरूच ठेवली आहेत.

मागणी मान्य होईपयर्ंत किंवा ठोस आश्‍वासन मिळेपर्यत दररोज शांततेत निदर्शने केली जाणार आहेत, असे गाळेधारकांनी यावेळी सांगितले. पुनर्वसनाबाबत कुणीही माहिती दिली नाही. किंवा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिलेले नाही. सरकारी अधिकार्‍यांवर दबाव आणण्यासाठी शांततेत सकाळच्या वेळेला निदर्शने केली जाणार आहेत. गाळ्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारी अधिकार्‍यांकडून वेळकाढूपणा केला जात आहे, असा आरोप गाळेधारकांनी केला.