गवंडाळी-कुंभारजुवे पुलाचे उद्घाटन

0
106

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल सकाळी गवंडाळी-कुंभारजुवे पुलाचे उद्घाटन झाले. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी हा पूल आता खुला झाल्याने पणजी ते माशेल दरम्यानचे अंतर किमान पाच ते सहा किलोमीटरने कमी होईल. या पुलांवर ४६ कोटी रुपये खर्च आला आहे. उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. पूल वाहतुकीसाठी खुला केल्याने संबंधित भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.