गणेशोत्सव देखावा स्पर्धेेत क्षत्रिय मराठा समाज कुंभारजुवा प्रथम

0
81

गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्यावतीने दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. याच अनुषंगाने कला आणि संस्कृती संचालनालयाच्यावतीने यंदाही गणेश चतुर्थी उत्सवाप्रीत्यर्थ सार्वजनिक गणेश मंडळासाठी राज्यस्तरीय देखावा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण २५ गणेश उत्सव मंडळांनी/संस्थांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा राज्यस्तरीय निकालजाहीर करण्यात आला आहे. त्यात प्रथम पारितोषिक रु. २५,००० क्षत्रिय मराठा समाज, रामभूवनवाडा, कुंभारजुवा. द्वितीय : रु. २०,००० कुंकळीकर बाल कला मंडळ हौसोवाडा, मडकई, तृतीय : रु. १५,००० कला युवक संघ (जुवेचा राजा), जुवे सांतइस्तेव.

याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिकांत प्रत्येकी रु. ७,०००ची एकूण पाच बक्षिसे काढण्यात आली.
पहिले : शांतादुर्गा कला आणि क्रीडा संघ वास्को, दुसरे : श्री सार्वजनिक गणेश उत्सव नेत्रावळी सांगे, तिसरे : एस. के. जोगींग सांस्कृतिक मंडळ म्हापसा, चौथे : युवा, मळा पणजी, पाचवे : गणराज कला मंडळ माडापै माशेल.
राज्यस्तरीय देखावा स्पर्धेचे परीक्षक म्हणून सचिन नाईक, राजेश साळगावकर व एकनाथ महाले यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे कला आणि संस्कृती संचालनालयाच्या विशेष कार्यक्रमात दिली जातील. कार्यक्र’ाची तारीख नंतर कळविली जाईल.