राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी सरकारने खाण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते महामंडळ सुरू करू नये, यासाठी राज्यातील खाण लीजधारक धमकी देत असल्याचा आरोप काल आयटकचे गोवा प्रमुख ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला. त्यांच्या या धमकीमुळे सरकारने कच खाल्ली असून, त्यामुळेच अद्याप हे महामंडळ सुरू करण्यात आलेले नाही. हे महामंडळ चालू देणार नाही, अशी धमकीच या खाण लीजधारकांनी सरकारला दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला.