Home बातम्या खून प्रकरणानंतर चेतन गावकर याचे निलंबन

खून प्रकरणानंतर चेतन गावकर याचे निलंबन

0

पत्नीच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या पती चेतन गावकर या संशयिताला एलडीसी पदावरून निलंबित केले आहे. सोमवारी संध्याकाळी उशिरा दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला. शनिवारी संध्याकाळी पत्नी हेमा गावकर हिचा खून केल्यानंतर पती चेतन गावकर हा फोंडा पोलिसांना शरण आला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश दिला होता. यानंतर सोमवारी संध्याकाळी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोंडा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात एलडीसी म्हणून काम करणाऱ्या चेतन गावकर याला सेवेतून निलंबित करण्याचा आदेश दिला.