अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केलं. तसेच राणा यांना दोन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच सदरचे खोटे जात प्रमाणपत्र सहा आठवड्यांच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे राणा यांची खासदारकीच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.