खाण व्यवसाय सरकारनेच चालवावा : सीताराम येच्युरी

0
204

खाण व्यवसाय सरकारतर्फेच चालवावा व खनिजाचा वापर देशी उत्पादनांसाठी वापरण्याची मागणी कम्युनिस्ट पक्षाचे नेते राज्यसभा खासदार सीताराम येच्युरी यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
देशी उत्पादनांसाठी वापरल्यानंतर शिल्लक खनिजाची निर्यात करण्यास हरकत नाही. खाणींचे सरकारीकरण झाल्यास त्याचा राज्याला तसेच कामगारांनाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारने इस्रायलकडून शस्त्रे खरेदी करू नयेत, शस्त्र खरेदी व्यवहारातून मिळणारा पैसा इस्रायल वाईट कामासाठी म्हणजे दहशत बळास खतपाणी घालण्यासाठी करतील, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्यावेळी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. त्यांचे सरकार धार्मिक तेढ वाढवून समाजाचे धृव्रीकरण करीत असल्याचा आरोप येच्युरी यांनी केला.
देशात लोक चळवळ उभारण्याची गरज आहे. ते केले तरच देशाचे कल्याण होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सध्या अर्थव्यवस्थेचा लाभ भांडवलदारांनाच करून देण्याकडे पंतप्रधानांचा कल असल्याचे त्यांनी सांगितले.