खाण धोरण येत्या १५ दिवसांत जाहीर न केल्यास आंदोलन

0
142

>> आमदार दीपक पाऊसकर यांचा सभेत इशारा

गोव्याची खाणी सुरु करताना सोसायटी तयार करून कामगारांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. खाणीचा प्रश्न सोडविण्यासाठी दि. २८ रोजी आमदार व मंत्री दिल्लीत जात असून त्यावेळी खाणी सुरु संकेत मिळण्याची शक्यता आहे. मात्र राज्य सरकारने खाण धोरण येत्या १५ दिवसात जाहीर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार दीपक पाऊसकर यांनी केले.

कळसई दाबाळ येथील सातेरी पिसांनी सभागृहात गोवा मायनिंग पीपल्स फोरमच्या बैठकीत आमदार दीपक पाऊसकर बोलत होते. यावेळी फोरमचे अध्यक्ष पुती गावकर , विनायक उर्फ बालाजी गावस व अन्य मान्यवर उपस्थित होते. सरकारने येत्या १५ दिवसात खाण धोरण जाहीर न केल्यास खाणग्रस्तांसोबत रस्त्यावर उतरणार असल्याचे आमदार दीपक पाऊसकर यांनी सांगितले. ट्रक मालकांना पॅकेज देण्याची प्रक्रिया सुरु असून कपात केलेल्या कामगारांना सुद्धा आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. येत्या दि. २८ रोजी काही मंत्री व आमदार दिल्लीत खाणीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जात असून त्यावेळी खाणी सुरु होण्याचे संकेत मिळू शकते. मात्र खाणी सुरु होण्यापूर्वी कामगारांचे प्रश्न व ट्रक मालकाचा वाहतुकीचा दर निश्चित करण्याची गरज असल्याचे आमदार दीपक पाऊसकर म्हणाले. पुती गावकर यांनी ट्रक मालकांना पॅकेज जाहीर करून खाणीचा प्रश्न सुटणार नाही असे सांगितले. फक्त सरकारवर दबाव आणून खाणी सुरु करण्यासाठी सरकारने अध्यादेश काढण्याची गरज आहे. सरकारला जाग येण्यासाठी दि. १ जून रोजी होणार्‍या जाहीर सभेत शक्तिप्रदर्शन दाखवण्याची गरज असल्याचे सांगितले.