खाण खंदकांची जबाबदार संबंधित कंपन्यांवर ः शिरोडकर

0
10

राज्यातील खाणीवरील खंदकांवर येत्या पावसाळ्यात देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित खाण कंपन्यांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकारांना काल दिली.

राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्यातील खाण कंपन्यांच्या अधिकार्‍यांसमोर सोमवारी एक बैठक घेतली. यात खंदकांच्या विषयावर चर्चा झाली. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर खाण कंपन्यांनी खंदकांवर लक्ष ठेवावे आणि जलस्रोत खात्याची गरज भासल्यास मदत घ्यावी असे बैठकीत ठरविण्यात आल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

जलस्रोत खाते खाण खंदकांतील पंपाचा वापर करून पाण्याचा उपसा करू शकते. परंतु, साधनसुविधांच्या अभावामुळे खाणींवर एखादी दुर्घटना घडल्यास नियंत्रण ठेवू शकणार नाही. जलस्रोत खात्याने अनेक खाणींवरील खंदकांवर पंप बसविले आहेत. मात्र, खाण सुरक्षेसंबंधीचा मोठा भार पेलू शकणार नाही. त्यामुळे कंपन्यांना खाणींवरील खंदकांवर देखरेख ठेवण्याची सूचना केल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.