खनिज घोटाळाप्रकरणी दोघांवर आरोपपत्र

0
92

खाण घोटाळा प्रकरणी तपासकाम करणार्‍या विशेष चौकशी पथकाने काल ‘सी गल आयर्न ओअर प्रा. लिमिटेड’ या कंपनीच्या दोघा संचालकांविरुध्द फसवणूक प्रकरणी वास्को येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. रेमिंग्टन आंताव (३१) व मोहम्मद उस्मान अशी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत. खनिज साठा उपलब्ध असल्याची बनावट कागदपत्रे आपल्या नावाने वरील दोन्ही संचालकांनी लेखापालाकडे सादर केल्याची तक्रार खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी खाण प्रकरणी चौकशी करणार्‍या विशेष चौकशी पथकाकडे केली होती. या पार्श्‍वभूमीवर एसआयटीने वरील दोन्ही संचालकांविरुध्द गुन्हा नोंदवला होता. काल त्यांच्याविरुध्द न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले.