रामदेव बाबा यांना आता ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा

0
92

विरोधकांकडून हल्ला होण्याची भीती असल्याने योग गुरू रामदेव बाबा यांना केंद्र सरकारने ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून या विषयी अहवाल मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता रामदेव यांना २४ तास ४० सुरक्षा रक्षकांकडून संरक्षण दिले जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रामदेव बाबा विदेशात काळा पैसा दडवून ठेवणार्‍यांविरोधात आवाज उठवत आले आहेत.