सोयीस्कर म्हणून मराठीतून शपथ घेतली : क्रीडामंत्री तवडकर

0
86

क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना राजभाषा कोकणीला डावलून मराठीतून शपथ घेतल्याबद्दल काणकोणच्या कोकणी प्रेमींनी कोकणी भाषा मंडळाच्या ध्वजाखाली तवडकर यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.या शिष्टमंडळात कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य, सचिव सूरज कोमरपंत, काणकोण कोकणी कला केंद्राचे अध्यक्ष कमलाकर म्हाळशी, तियात्र अकादमीचे सदस्य रमेश कोमरपंत, कला सांस्कृतिक संवर्धन केंद्राचे अध्यक्ष संजय कोमरपंत, सूत्रनिवेदक आणि कवी अनंत अग्नी यांचा समावेश होता.
शपथविधी इतक्या गडबडीत झाला की त्यावेळी मराठी, कोकणी आणि इंग्रजीतून पेपर देण्यात आला होता. सोयिस्कर पडते म्हणून आपण मराठीतून शपथ घेतली. या सर्व गोष्टी नकळत घडल्या. राजभाषा कोकणीबद्दल आपल्याला अभिमान असून ज्या ज्या वेळी संधी मिळते त्यावेळी आपण कोकणीचाच वापर करीत असल्याचे मत क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.