Home बातम्या कोळसा हाताळणीस परवानगी नाकारली

कोळसा हाताळणीस परवानगी नाकारली

0

गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाने मार्च २०१३पर्यंत मुरगाव बंदरावरील बर्थ क्र. ९ व १०वर कोळसा हाताळणीस मान्यता देण्यास नकार दिला. मुरगाव पोर्ट ट्रस्टकडून तशी मागणी करण्यात आली होती.

कोळसा हाताळणीस मान्यतेस परवाना देण्याबाबत मार्चअखेरनंतर निर्णय घेणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. कोळसा प्रदुषणाच्या तक्रारी वास्को शहरातून आल्यानंतर सदर परवाना मागे घेण्यात आला होता.