कोलंबिया विजयी

0
72

कोलंबियाने अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेतील काल गुरुवारी झालेल्या सामन्यात अमेरिकेचा ३-१ असा पराभव केला. पराभवानंतरही अमेरिकेने तिसर्‍या स्थानावरील सर्वोत्तम संघ म्हणून बाद फेरीत स्थान मिळविले. ‘अ’ गटात घाना व कोलंबियाचे प्रत्येकी ६ गुण झाले. परंतु, कमी गोलफरकामुळे त्यांना दुसर्‍या स्थानी समाधान मानावे लागले.

काल कोलंबियाकडून युआन विदाल (तिसरे मिनिट), युआन पेनेलोझा (६७वे मिनिट) व दिएबर कायकेदो (८७ वे मिनिट) यांनी गोल केले. अमेरिकेचा एकमेव गोल जॉर्ज अकोस्ता याने २४व्या मिनिटाला नोंदविला. बाद फेरीत १६ ऑक्टोबर रोजी कोलंबियाचा सामना होणार आहे. आज किंवा उद्याच्या सामन्यांनंतर त्यांचा प्रतिस्पर्धी निश्‍चित होणार आहे.