देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र गेल्या काही काळापासून लसीकरणाचा वेग मंदावला आहे. जुलै महिन्यात १३ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य देशासमोर असून या महिन्याभरात आतापर्यंत ९.९४ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या गतीने लसीकरण झाल्यास जुलै महिना अखेरपर्यंत १२.५ कोटी डोस दिले जातील.
१८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून म्हणजे २१ जूनपासून लसीकरणाचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २९ हजार ६८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४१५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.