कोरोना रुग्णांनी इस्पितळे भरली

0
103

>> दिगंबर कामत यांचे सरकारवर टीकास्त्र

राज्यातील कोविड इस्पितळ व कोविड केअर सेंटरांमधील सर्व खाटा भरलेल्या असतानाही गोवा सरकार कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अतिरिक्त खाटांची सोय करीत नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल आश्‍चर्य व संताप व्यक्त केला.
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी स्वत:च राज्यातील कोरोना रुग्णांसाठीच्या सगळ्या खाटा भरल्या असल्याचे स्पष्ट केले आहे, असे कामत म्हणाले. आता सरकारने कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना स्वत:च्या घरीच विलगीकरणात राहण्याची सूचना केलेली असून राज्य सरकारला आता लोकांच्या घरांचे रुपांतर कंटेनमेंट झोनमध्ये करायचे आहे काय, असा सवालही कामत यांनी केला आहे.

मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पूर्ण क्षमतेने सुरू करावे व तेथे उपलब्ध असेलेले दोन रिक्त मजले कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरले जावेत, अशी मागणी काल कामत यांनी केली. राज्य सरकारची चुकीची धोरणे व निर्णय यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना योग्य उपचार मिळू शकत नसल्याचा आरोपही काल कामत यांनी केला. राज्यातील लोकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारकडे कोणतीही कृती योजना नसल्याचा आरोपही त्यांनी काल केला.