सरकार जिल्हा इस्पितळाचेखासगीकरण करू पाहतेय

0
110

>> सरदेसाई यांची टीका

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासंबंधी सरकारच्या ज्या काही योजना आहेत, त्यासंबंधीची श्‍वेतपत्रिका सरकारने २४ तासांत काढावी, अशी मागणी काल गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली. सरकारचा या इस्पितळाचे खासगीकरण करण्याचा विचार आहे काय, हेही सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली आहे.

राज्यात कोविड रुग्णांसाठी खाटा कमी पडत असताना सरकारने नव्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे दोन मजले रिकामे असतानाही ते कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी न देता तसेच रिकामे का ठेवले आहेत, याची माहितीही आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी जनतेला द्यावी, अशी मागणीही विजय सरदेसाई यांनी रविवारी केली.