प्रत्येक अमली पदार्थ प्रकरणाचा गोव्याशी संबंध कसा?

0
125

>> गिरिश चोडणकर यांचा सवाल

भाजपने गोव्याचे रुपांतर अमली पदार्थाच्या केंद्रात झाले असल्याने आता प्रत्येक अमली पदार्थ प्रकरणाचा संबंध गोव्याशी जोडला जाऊ लागला असल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. भाजप आणि अमली पदार्थ माफिया यांच्या संबंधांचे धागेदोरे तपासण्यासाठी माजी पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांच्या अकाली निधनाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

नंदा हे गेल्या नोव्हेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. ते एक कर्तबगार पोलीस अधिकारी होते व गोव्यातील अमली पदार्थ व्यवहारांची चौकशी करीत होते. त्यांची प्रकृती चांगली होती व मोठा मानसिक दबाव आल्यानेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.