राज्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. या महिन्यात एकूण नवीन १९०८ कोरोना बाधित आढळून आले असून आणखीन ३ कोरोना बाधितांचा बळी गेला आहे. तर, २२ कोरोना बाधितांना इस्पितळात दाखल करावे लागले. राज्यातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या २४१ एवढी झाली असून कोरोना बळींची एकूण संख्या ३,९६६ एवढी झाली आहे.
राज्यात मागील जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये कोरोना नवीन बाधितांच्या संख्येत वाढ नोंद झाली होती. तर, सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गत ऑगस्ट महिन्यात ४०६६ नवे कोरोना बाधित आढळून आले होते. तसेच, आणखीन ११ बळींची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात ३३९२ कोरोनाबाधित आणि १४ कोरोना बळींची नोंद झाली होती. तसेच, जुलै महिन्यात मागील काळातील आणखी १०० कोरोना बळींची नोंद करण्यात आली होती. तर, जून महिन्यात नवीन २९१७ कोरोना बाधित आढळून आले होते, तर आणखी ६ कोरोना बळींची नोंद झाली होती.
राज्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधित आढळून येण्याची सरासरी टक्केवारी ७.८० टक्के एवढी आहे. या महिन्यात २४ हजार ४३४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे.