कोरोनामुळे राज्यात आणखी चार मृत्यू

0
116

>> बळींची संख्या ४०, नवे २०२ पॉझिटिव्ह

राज्यात कोरोना विषाणूने आणखी चौघांचा बळी घेतला असून कोरोना बळीची संख्या ४० झाली आहे. राज्यात नवीन २०२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १६६६ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह १८९ रुग्ण बरे झाले आहेत.
मृत्यू झालेल्यांमध्ये मडगाव येथील कोविड इस्पितळातून वास्को येथील एमपीटी कोविड केअर सेंटरमध्ये पाठविलेलण्यात आलेल्या सडा वास्को येथील ७१ वर्षीय व्यक्ती, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात मृतावस्थेत आणण्यात आलेल्या उसकई येथील ५६ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळली. मडगाव येथील एका ४३ वर्षीय महिलेचा समावेश असून पर्वरी येथील एका कोरोना रुग्णाचा कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. मडगावच्या महिलेला एका खासगी इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली.

कोरोना पॉझिटिव्ह ५४८९
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ५४८९ झाली असून ३७८४ रुग्ण बरे झाले आहेत. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत ५१८१ स्वॅबचे नमुने चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. ७५६८ स्वॅबच्या नमुन्यांपैकी २३८७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात ३५ जणांना दाखल करण्यात आले आहेत.

वास्कोत नवे २२ रुग्ण
वास्को येथे नवीन २२ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ४०३ झाली आहे. कासावलीत नवीन २ रुग्ण आढळले आहेत. कुठ्ठाळी येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णसंख्या ३४१ झाली आहे.

लोटली, कुडतरीत नवे रुग्ण
लोटली भागात नवीन १० रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३९ झाली आहे. कुडतरी येथे नवीन ६ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३३ झाली आहे.

नावेली, कुडचडेत नवीन रुग्ण
नावेली येथे नवीन २ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या २५ झाली आहे. कुडचडे येथे नवीन १ रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या ११ झाली आहे.

धारबांदोड्यात नवे ७ रुग्ण
धारबांदोडा येथे नवीन ७ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ४३ झाली आहे. केपे येथे नवे २ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १० झाली असून सांगे येथे १ रुग्ण आढळल्यामुळे रुग्णसंख्या ५ झाली आहे.

पणजीत नवीन २ रुग्ण
पणजी येथे नवीन २ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ६१ झाली आहे. मार्केट परिसरात रुग्ण वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

म्हापसा, साखळीत नवे रुग्ण
म्हापसा येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ४० झाली आहे. साखळी येथे नवीन ३ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ६६ झाली आहे.

मये येथे नवीन ३ रुग्ण
मये भागात नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ५ झाली आहे. पर्वरी येथे नवीन १ रुग्ण आढळला आहे. कांदोळी आणि हळदोणा येथे प्रत्येकी नवीन १ रुग्ण आढळला आहे.

१३३ रूग्णांची माहिती नाही
आरोग्य खात्याने जारी केलेल्या दैनंदिन पत्रकात राज्यात २०२ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याची माहिती दिली आहे. खात्याच्या पत्रकामध्ये ६९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती मिळत असून १३३ पॉझिटिव्ह रुग्णांबाबत काहीच माहिती मिळत नाही.