कोरोनामुळे देशात ५०१ जणांचा मृत्यू

0
26

देशात सध्या कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट होताना दिसत असतानाच गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांचे आकडे पुन्हा एकदा चिंता वाढवणारे ठरले आहेत. काल एका दिवसात देशात कोरोनामुळे ५०१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १२,५१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या आता ३,४४,१४,१८६ वर पोहोचली आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत मात्र घट नोंदविण्यात आली आहे. देशात सध्या १,३७,४१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २६७ दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे.

देशात गेल्या २४ तासांत ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत मृत्यूंचा आकडा ४,६२,६९० वर पोहोचला आहे. सलग ३५ व्या दिवशी देशात कोरोना रुग्णांची संख्या २० हजाराहून कमी दिसून आली आहे. दरम्यान, गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले.