कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

0
6

राज्यात चोवीस तासांत नवे 19 कोरोनाचे रुग्ण

राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. चोवीस तासांत नवीन 19 बाधित आढळून आले असून एका बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आला आहे. नवीन बाधित आढळून येण्याचे प्रमाण 4.4 एवढे आहे.
राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या चारशेच्या खाली आली असून ती 357 एवढी झाली आहे. चोवीस तासांत आणखी 426 स्वॅबची चाचणी करण्यात आली आहे. तसेच, 18 बाधित कोरोना मुक्त झाले आहेत.

राज्यात मार्च महिन्याच्या अखेरपासून नवीन बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून 12 एप्रिलपर्यंत दरदिवशी शंभरपेक्षा जास्त बाधित आढळून येत होते. त्यानंतर नवीन बाधितांची संख्या शंभरच्या आतमध्ये होती. आता महिन्याच्या अखेरच्या दिवशी कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 4 टक्क्यांवर आले आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. नागरिकांना कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच, बांबोळी येथे गोमेकॉमध्ये कोविड बाधित रुग्णांवरील उपचारांचा आढावा घेण्यात आला होता. राज्यात नवीन बाधितांची संख्या वाढत असली तरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत नव्हते. काही मोजकेच नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसून येत होते.