कोरोनाने काल दोन बळी

0
243

काल बुधवारी राज्यात कोरोनामुळे दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात बळींची संख्या ७०३ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाचा संसर्ग झालेले १०१ रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ०३६ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनाचे सध्याचे रुग्ण १२७७ एवढे आहेत अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

काल दिवसभारत १३२ जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची राज्यातील संख्या ४७,०५६ झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत ३,६४,६७२ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या १३,६७१ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २५,४१३ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.