सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील तिर्लोट येथील योगिता गणपत घाडी (५८) या तिर्लोट उपकेंद्रात कोवीशिल्डचा पहिला डोस घेऊन बसल्या असता खाली कोसळल्या. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेमधून देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. कोविशील्डचा पहिला डोस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रीतसर पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.