कॉंग्रेस विधिमंडळ बैठकीत अधिवेशनाची व्यूहरचना

0
102

कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या काल झालेल्या बैठकीत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी नागरिक, टॅक्सी चालक, कर्मचारी वर्ग यांना भेडसावणार्‍या समस्यांना वाचा फोडण्याबाबत विचारविनिमय केला आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

विधानसभेत प्रश्‍न, उपप्रश्‍न विचारण्याबाबत चर्चा केली. राज्यातील टूरिस्ट टॅक्सी मालक, गोवा मनुष्यबळ महामंडळ, बांधकाम खात्यातील कामगारांनी व इतरांनी आपल्या समस्यांचे निवेदन कॉंग्रेसच्या आमदारांना सादर करून प्रश्‍न विधानसभेत मांडण्याची विनंती केली आहे, असेही कवळेकर यांनी सांगितले.

टूरिस्ट टॅक्सीच्या प्रश्‍नावर कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. टूरिस्ट टॅक्सी चालकांनी प्रथम आपली भूमिका निश्‍चित करावी. त्यानंतर कॉंग्रेस पक्ष भूमिका घेणार आहे. गोवा माईल्स नको असल्यास टूरिस्ट टॅक्सी मालकांनी डिजिटल मीटर बसविण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे कवळेकर एका प्रश्‍नावर उत्तरले.