Home बातम्या कॉंग्रेसची मान्यता काढून घेण्याची भाजपची मागणी

कॉंग्रेसची मान्यता काढून घेण्याची भाजपची मागणी

0

राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध जोडणारे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला आक्षेप घेऊन काल भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त व्ही. एस. संपथ यांच्याकडे तक्रार नोंदवली. राहुल गांधी यांचे वरील वक्तव्य निवडणुकीआधी जातीय तणावास निमंत्रण देणारे असल्याचा दावा भाजपने केला आहे.

राहुल हे खासदार व कॉंग्रेसचे उपाध्यक्षही आहेत. असे असूनही त्यांच्याकडून वारंवार निवडणूक आचार संहितेचा भंग होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षाची मान्यता काढून घेण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावेळी सांगितले की वरील वक्तव्यामागील राहुल गांधी यांचा सूर लोकांना चिथावण्याचा व भाजप व रा. स्व. संघ यांच्याविषयी घृणा निर्माण करणारा होता. भाजप हा हिंदू-मुस्लिमांमध्ये शत्रुत्व निर्माण करणारा पक्ष आहे, अशी लोकांमध्ये खोटी समजूत पसरविण्याचा राहुल गांधी यांचा हेतू होता असेही ते म्हणाले.