केस गळणे

0
339
  •  डॉ. अनुपमा कुडचडकर

ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांनाही केस गळतीचा त्रास होऊ शकतो. पॉलिसिस्टिक ओव्हेरीयन सिंड्रोम (पीसीओएस), थायरॉइडचा आजार, मधुमेह यांसारख्या आजारांमुळेही केस गळतात.
ज्यांना आपले केस चांगले राहावेत असे वाटत असेल त्यांनी आपल्या केसांची चांगली निगा राखली पाहिजे.

झाडावरची पिकलेली पानं जशी गळून पडतात व नवीन पानं उगवतात त्याचप्रमाणे आपले केस गळून पडून नवीन केस त्याजागी येत असतात. प्रत्येक दिवशी ५० ते १०० केसांचं गळणं हे नैसर्गिक मानलं जातं. पण जेव्हा केस गळण्याचं प्रमाण शंभरापेक्षा जास्त वाढतं तेव्हा काळजी वाटायला लागते. शंभरापेक्षा जास्त केस गळण्यामागे काही कारणं असू शकतात.
जेव्हा केस अचानक गळायला लागतात…
– त्यामागे प्रथिनांची कमतरता वा असमतोल आहार, काही शारीरिक व्याधी, हॉर्मोन्समध्ये झालेले बदल, प्रमाणाबाहेरचा मानसिक ताण… ही असू शकतात. – काहींना मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू होऊन गेल्यानंतर ३-४ महिन्यांचे त्यांचे केस गळायला लागतात.

– काही बायकांमध्ये प्रसूतीच्या ४-५ महिन्यांनंतर केस गळायला लागतात. डोक्यावर कोंडा जास्त प्रमाणात झाला किंवा काही इन्फेक्शन झालं तरीही केस गळतात.
केस गळण्यामागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे हॉर्मोन्समध्ये झालेले बदल. पुरुषांमध्य हॉर्मोन्स बदलांमुळे होत असलेल्या केस गळतीला एन्ड्रोजनिक एलोपेशिया म्हणतात आणि बायकांमध्ये होत असलेल्या केस गळतीला फिमेल पेटरन एलोपेशिया म्हणतात.
जसजसं पुरुषांचं वय वाढत जातं तसतसं त्यांच्या डोक्यावर टक्कल दिसायला लागतं. हल्ली तरुण वयातच मुलांचे केस लवकर गळायला लागलेले दिसतात. सुरुवातीला डोक्यावरचे पुढील भागावरचेस गळायला लागतात. हळूहळू तो भाग मागे सरू लागतो आणि कपाळावरचे केस गळून कपाळ मोठं दिसायला लागतं. त्याचप्रमाणे बायकांचे टाळूवरचे केस शरीरात काही हॉर्मोन्समध्ये बदल झाला तर गळाय.ला लागतात. त्याचप्रमाणे डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, रंग, रसायने, ब्लीच, केसांवर इस्त्री केल्यामुळेही गणणार्‍या केसांना गुणायला अधिकच चालना मिळते. केसांना रंग लावले वा इस्त्री केली तर केस कोरडे पडतात व तुटायला लागतात. केस परत परत विंचरले वा प्रमाणाबाहेर रसायन केसांना लावले तर केसात दुभाजन होतं (स्प्लिट एन्ड्‌स).
– ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांनाही केस गळतीचा त्रास होऊ शकतो. पॉलिसिस्टिक ओव्हेरीयन सिंड्रोम (पीसीओएस), थायरॉइडचा आजार, मधुमेह यांसारख्या आजारांमुळेही केस गळतात.
ज्यांना आपले केस चांगले राहावेत असे वाटत असेल त्यांनी आपल्या केसांची चांगली निगा राखली पाहिजे.

– आठवड्यातून दोन वेळा शॅम्पू लावून केस स्वच्छ धुतले पाहिजेत.
– ज्यांना कोंडा वा डोक्यावर काही त्वचेचे आजार असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर अगोदर उपचार केले पाहिजेत. जेव्हा केस गळायला सुरुवात होते तेव्हा ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही रक्त चाचण्या केल्या पाहिजेत. हिमोग्लोबीन, ब्लड आयर्न पातळी, थायरॉइड, रक्तातील साखर इत्यादी. ज्यांना पीसीओएसचा त्रास असेल त्यांनीही स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार केले पाहिजेत.
केसांची गळती कमी करायला आपला आहार चांगला समतोल असावा.
रक्तामध्ये कोणत्याही घटकांची कमतरता दिसली तर त्यावर योग्य प्रमाणात योग्य गोळ्या घ्याव्यात. डोक्यावर लावण्यासाठी औषधं असतात, ती लावावीत. मिनाक्सिडील नावाचं औषध केसगळती कमी करण्यासाठी वापरतात. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. फारच टक्कल पडलं असेल तर हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करून डोक्याच्या मागच्या भागावरचे केस पुढच्या भागावर रोपण करून परत एकदा डोक्यावर केस उगवू शकतो.