केरळमध्ये आयसिस संबंधित पाच संशयितांना अटक

0
73

केरळमधून पाच तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे तरुण आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याचा संशय आहे. केरळमधील कन्नूर भागात काल दि. २५ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. आयसिसच्या संपर्कात असलेले भारतीय तरुण परदेशातून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांची कसून चौकशी केली असता हे तिघेही तुर्कस्तानातून भारतात परतल्याचे समोर आले आहे. केरळमधील वेलापट्टणम आणि चक्करकल या भागातील ते मूळचे रहिवासी आहेत. दहशतवादी कारवायांसारख्या गंभीर प्रकरणांशी संबंधीत असल्याने तसेच त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पोलिसांनी या संशयितांची ओळख अद्याप उघड केलेली नाही.