केजरीवाल २९ रोजी फोंड्यात करणार युवकांशी वार्तालाप

0
83

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येत्या दि. २९ जून रोजी कुर्टी-फोंडा येथील सावित्री सभागृहात युवकांशी वार्तालाप करणार आहेत. दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन आम आदमी पक्षाचे युवा नेते ऍड. सुरेल तिळावे यांनी काल पत्रकार परिषदेत केले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दि. २८ व २९ रोजी गोव्याच्या दौर्‍यावर येणार असून बेरोजगार युवकांची समस्या जाणून घेण्याचा कार्यक्रम कुर्टी येथे होणार आहे. गोमंतकीय युवकांच्या समस्यांवर मार्गदर्शन करून जाहीरनाम्याबद्दल लोकांशी चर्चा करणार आहेत. कारण गोमंतकीयांना भेडसावणारी समस्या जाहीरनाम्याचा मुख्य भाग राहणार असल्याचे ऍड. तिळवे यांनी सांगितले. गोवाभरातून ३०० हून अधिक युवक या वार्तालाप कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. युवकांनी त्यांच्या समस्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे बिनधास्त सांगाव्यात असेही ऍड. तिळवे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस डॉ. हेमाली देसाई व सुकेंदु रेड्डी उपस्थित होते.