केंद्रीय मंत्री स्मृती इराण यांना कोरोनाची बाधा

0
22

केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती त्यांनी काल रविवारी ट्विट करून दिली. स्मृती इराणी या दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये एका निवडणूक सभेसाठी उपस्थित राहणार होत्या. मात्र त्यांनी तेथील लोकांची माफी मागत, आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आपण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असे म्हटले आहे. दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी २३ जून रोजी मतदान होत आहे. भाजपचे उमेदवार राजेश भाटिया यांच्या समर्थनार्थ स्मृती इराणी रविवारी निवडणूक सभेत सहभागी होणार होत्या. मात्र, कोरोनाची लागण झाल्याने आता त्यांना या सभेत सहभागी होता येणार नाही.