केंद्रीय मंत्री गेहलोत २१ पासून गोवा भेटीवर

0
110

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री तंवरचंद गेहलोत २१ तारखेला दोन दिवसांच्या गोवा दौर्‍यावर येत आहेत. श्री. गेहलोत २१ तारखेला राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांची संध्याकाळी ७.३० वाजता भेट घेणार आहेत. तर २२ तारखेला ते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेणार आहेत. तसेच तिसर्‍या राष्ट्रीय अंध व मुक बधीर जुडो स्पर्धेच्या समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच संध्याकाळी ते दिल्लीला रवाना होतील.