कृषीविषयक सर्व मागण्यांची पूर्तता करणार : रवी नाईक

0
6

आमदारांनी सभागृहात कृषीविषयक मांडलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता केली जाणार असून, त्यांच्या मागण्या व सूचना खात्याकडे पाठविण्यात येणार आहे, अशी ग्वाही कृषीमंत्री रवी नाईक यांनी काल विधानसभेत कृषी खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.
राज्य सरकारच्या नवीन कृषी धोरणाच्या मसुदा अजूनपर्यंत कुणालाही देण्यात आलेला नाही. स्थानिक पातळीवरील भाजी उत्पादनात वाढ झाली आहे. स्थानिक भाजी उत्पादन 3 कोटींवरून 6 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, असेही रवी नाईक यांनी सांगितले. राज्यातील खाजन बांधाची दुरुस्ती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील कृषी विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. अतिरिक्त निधीची गरज भासल्यास केंद्रीय पातळीवरून निधी आणला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.