कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी कायदे आवश्यक

0
141
  • ऍड. प्रदीप उमप

आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स ही प्रणाली २१ व्या शतकातील सर्वाधिक विनाशकारी आणि सेल्ङ्ग ट्रान्स्ङ्गॉर्मेटिव्ह म्हणजेच आत्मपरिवर्तनशील प्रणाली ठरण्याची चिन्हे आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास, जर आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचे नियमन योग्य प्रकारे केले गेले नाहीत, तर त्याच्या चांगल्या परिणामांबरोबरच अनेक वाईट परिणामही होऊ शकतात.

कृ त्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्टचा वापर केवळ अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देशांमध्येच नव्हे, तर आपल्याही देशात आता वाढत आहे. या तंत्रज्ञानाचे जसे काही सकारात्मक परिणाम आहेत, तसेच नकारात्मक परिणामही आहेत. मात्र, आगामी काळात या तंत्रज्ञानाचा वापर वाढतच जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी एक प्रभावी धोरण आणि कायदा तयार होणे गरजेचे आहे. यावर्षी ङ्गेब्रुवारी महिन्यात केरळ पोलिसांनी दैनंदिन कामकाजासाठी यंत्रमानवाचा वापर सुरू केला. त्याच महिन्यात चेन्नईमध्ये एक रेस्टॉरंट सुरू झाले. त्यातील वेटर रोबो असून, ते केवळ ग्राहकांना सेवाच देतात असे नाही तर त्यांच्याशी इंग्रजीतून आणि तमिळ भाषेतून गप्पाही मारतात. तत्पूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये एका हृदयरोग तज्ज्ञाने सुमारे ३२ किलोमीटर दूर असणार्‍या रुग्णावर ‘इन-ह्यूमन टेलीरोबोटिक कोरोनरी इंटर्व्हेन्शन’ नावाचा उपचार केला होता. थोडक्यात सांगायचे झाले तर दूरच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यस्थळी यंत्रमानवाची उपस्थिती भविष्यातील एका विशिष्ट कार्यसंस्कृतीचे संकेत देत आहे. ही कार्यसंस्कृती म्हणजे अर्थातच आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता होय.

आपल्या दैनंदिन जीवनाचा दरवाजा आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्सने ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर आपले कामही सुरू केले आहे. त्याचबरोबर वर दिलेल्या उदाहरणांमधून असे दिसून येते की, आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्सचे काही ङ्गायदे निश्‍चित आहेत. परंतु त्याचबरोबर आपल्याला या तंत्रज्ञानाचे काही तोटेही झेलावे लागणार आहेत. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एकतरी नकारात्मक पैलू असतोच. आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स प्रणालीत स्वतःहून अनुभवातून शिकण्याची आणि नंतर त्यानुरूप कामे करण्याची क्षमता असते, हे उल्लेखनीय आहे. या क्षमतेमुळेच आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स ही प्रणाली २१ व्या शतकातील सर्वाधिक विनाशकारी आणि सेल्ङ्ग ट्रान्स्ङ्गॉर्मेटिव्ह म्हणजेच आत्मपरिवर्तनशील प्रणाली ठरण्याची चिन्हे आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास, जर आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचे नियमन योग्य प्रकारे केले गेले नाहीत, तर त्याच्या चांगल्या परिणामांबरोबरच अनेक वाईट परिणामही होऊ शकतात.
अशी कल्पना करा की, आपल्या प्रिय व्यक्तीवर एखादी शस्त्रक्रिया यंत्रमानव करीत आहे आणि अचानक विद्युतपुरवठा खंडित झाला. आपल्या देशात अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये ही समस्या आहेच. डॉक्टरांशी असलेला यंत्रमानवाचा संपर्क यामुळे तुटला, तर काय होईल, असा विचार करून पाहा. त्याचप्रमाणे एखादे ड्रोन एखाद्या माणसाला धडकले तर काय होईल, याचाही विचार करून पाहा. या तंत्रज्ञानावर अशा प्रकारचे अनेक प्रश्‍न जगभरात उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आज ना उद्या हे प्रश्‍न भारतातही उपस्थित केले जाणारच आहेत. हे प्रश्‍न विचारले जाणे स्वाभाविक आणि आवश्यक अशासाठी आहे की, आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाबरोबर अनेक आव्हाने वाटचाल करीत आहेत.
भविष्यकाळात या तंत्रज्ञानाविषयी जी कायदेशीर संकटे किंवा मुद्दे उभे राहतील त्यासंबंधी भविष्यवाणी करणे, त्यांचे मूल्यमापन करणे आणि त्या समस्यांची सोडवणूक करणे ही कामे सोपी नाहीत. त्याचप्रमाणे आजच्या ङ्गौजदारी कायद्यासमोर जे प्रचंड मोठे आव्हान उभे राहील, त्याच्या व्याप्तीचा अंदाज बांधणे ङ्गारसे अवघड नाही. उदाहरणार्थ, आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारलेल्या गाडीचा अपघात झाला आणि एखाद्या व्यक्तीची जीवित आणि वित्तहानी झाली, तर काय करणार? या तंत्रज्ञानाने ती मुद्दाम केली की अनवधानाने इजा झाली, हे ठरविणे सोपे असेल? यंत्रमानव साक्षीदाराच्या पिंजर्‍यात उभे राहू शकतील? वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी एक औजार म्हणून रोबोंचा वापर होऊ शकेल? इसाक असिमोव्ह यांची ‘रन अराउंड’ ही कथा १९४२ मध्ये प्रसिद्ध झाली होती. या लघुकथेत यंत्रमानव तंत्रज्ञानाच्या म्हणजेच रोबोटिक्सच्या तीन नियमांची चर्चा करण्यात आली होती. तेव्हापासून आज कुठे जगभरात या तंत्रज्ञानाविषयी कायदा हवा, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
अमेरिकेत आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्सच्या नियमांविषयी मोठी चर्चा सुरू आहे. जर्मनीने स्वयंचलित वाहनांसाठी नैतिक आधारावर नियम तयार केले असून, संपत्ती किंवा पशुजीवनापेक्षा मानवी जीवनाला प्राधान्यक्रम दिला जावा असे म्हटले आहे. जर्मनीचे अनुकरण करीत चीन, जपान आणि कोरियात स्वयंचलित वाहनांसाठी कायदे तयार केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्या देशात काय चालले आहे? जून २०१८ मध्ये नीती आयोगाने ‘नॅशनल स्ट्रॅटेजी ङ्गॉर आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स’ नावाचा धोरणात्मक दस्तावेज जारी केला. त्यात विविध क्षेत्रात या तंत्रज्ञानाच्या महत्त्वाविषयी चर्चा करण्यात आली आहे. आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्ससंदर्भात लवकरच एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव येईल, असे अपेक्षित आहे. अर्थात ही चर्चा तंत्रज्ञानाधारित मुद्द्यांच्याच भोवती ङ्गिरत असून आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स उद्योगाचे नियमन करण्यासाठी एखादा ठोस कायदा तयार करण्याचा विचार आपल्या देशात अद्याप सुरूही झालेला नाही. ही अवस्था चांगली नाही. भविष्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. सर्वांत आधी आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्सची कायदेशीर व्याख्या करणे अत्यावश्यक आहे. भारतात ङ्गौजदारी कायद्याच्या अस्तित्वाचे जे महत्त्व आहे, त्याप्रमाणेच आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाला एक कायदेशीर अस्तित्व देणे क्रमप्राप्त आहे. या तंत्रज्ञानाचा संबंध कोणत्या हेतूशी जोडला जाऊ शकतो की नाही, म्हणजेच आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्सचे अधिकार आणि कर्तव्ये काय असतील, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. आपल्याकडे खासगी जीवनातील गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स उत्पादनांमध्ये जो डाटा असतो, त्याचा वापर करण्यासंबंधी आणि डाटा नियमनासंबंधी काही नियम तयार करणे अत्यावश्यक आहे. पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०१८ या कायद्याशी हे नियम जोडले जाऊ शकतात. रस्त्यांवरील अपघातांमध्ये भारतात दररोज जवळजवळ ४०० लोकांचा मृत्यू होतो. नव्वद टक्के अपघातांमागील कारण मानवी चूक हेच असते आणि ते अपघात टाळले जाऊ शकण्याजोगे असतात. आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित वाहने आल्यास ही आकडेवारी बरीच कमी करता येणे शक्य होईल, यात शंकाच नाही. विशेषतः स्मार्ट वॉर्निंग, संरक्षणात्मक उपाय आणि प्रतिबंधात्मक उपाय अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे शक्य आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे सहसा अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील अंतर कमी करता येऊ शकते. परंतु तरीही आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्सकडे कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहणे, विचारविनिमय करणे आणि कायदे बनविण्याविषयी चर्चा सुरू करणे हा पैलूही अत्यंत महत्त्वाचा असून, तसे न केल्यास ङ्गार उशीर झाला असे नंतर आपल्याला वाटू शकेल.