कुलभूषण जाधवांच्या फाशीस स्थगिती

0
81

>> आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतरिम निवाडा; पाकिस्तानला निर्णय अमान्य

भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांच्या ङ्गाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती देत पाकिस्तानला मोठी चपराक लगावली आहे. या निकालामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या विश्वासार्हतेत भर पडली आहे.

‘कुलभूषण जाधव यांनी हेरगिरी केली हा दावा टिकणारा नाही. ते हेर आहेत की नाही, हे अजून सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे पाकिस्तानने जाधवांना कायदेशीर आणि राजनैतिक मदत द्यायला हवी होती’, असे सांगत आंतरराष्ट्रीय कोर्टाचे अध्यक्ष रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानला दणका दिला. ‘भारताची मागणी व्हिएन्ना कायद्यानुसार योग्यच आहे. आपल्या नागरिकाला कायदेशीर मदत करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे’, असेही न्यायालयाने सांगितले. तसेच अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण यांना ङ्गाशी देता येणार नाही, असे निर्देशही त्यांनी पाकिस्तानला दिले आहेत. त्यामुळे आता कुलभूषण यांची बाजू मांडण्यासाठी, वकील देण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच यावेळी पाकला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे ही पाकिस्तानची जबाबदारी असून त्याचे उल्लंघन केल्यास पाकिस्तानवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
भारतासाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने ङ्गाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात कणखरपणे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.
पाकिस्तानने लष्करी न्यायालयात बनावट सुनावणी घेऊन कुलभूषण जाधव यांना ङ्गाशीची शिक्षा सुनावली आहे, त्यांना वकिलाची मदत नाकारल्याने न्यायाचीच हत्या झाली आहे, असा जोरदार युक्तिवाद सोमवारी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता. जाधव यांना झालेली ङ्गाशीची शिक्षा तातडीने रद्द करावी, अशी मागणी करतानाच जाधव यांना ङ्गाशी झाल्यास पाकिस्तान हा युद्धगुन्हेगार असेल, असा इशाराही भारताने या वेळी दिला होता. भारताची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी मांडली होती.
त्यानंतर, पाकिस्तानने भारताचे आरोप ङ्गेटाळून लावले होते. त, कुलभूषण जाधव यांना हेर ठरवणारे काही पुरावे मांडण्याचा प्रयत्न पाकने केला होता. जाधव यांच्या कबुली जबाबाचा सहा मिनिटांचा व्हिडिओ दाखवण्याची परवानगी मागितली. आम्ही भारताला पुरावे दिले होते, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, जाधव यांच्या प्रकरणात व्हिएन्ना करार लागूच होत नाही, असे दावे त्यांनी केले. ते पोकळ आणि खोटे असल्याचे या निकालामुळे सिद्ध झाले.
पाकिस्तानला निर्णय अमान्य
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, त्यामुळे ङ्गाशीच्या स्थगितीचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. तर शेजारच्या देशानं आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करायला हवे, असा सल्ला भारताने पाकला दिला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालावर पाकिस्तानने नाराजी दर्शवत हा निर्णय मान्य करण्यास नकार दिला आहे. जर पाकने हा निर्णय खरोखरच मान्य केला नाही तर भारत सुरक्षा परिषदेचे दार ठोठावण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या अधिकारपत्रानुसार, संयुक्त राष्ट्राचा प्रत्येक सदस्य आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय मान्य करायला कटिबद्ध आहे. जर एखाद्या राष्ट्राने हा निर्णय मान्य करण्यास नकार दिला तर दुसरा देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे दाद मागू शकतो, अशी या कायद्यात तरतूद आहे.