कुंकळ्ळी युनियनला जेतेपद

0
108

>>अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धा

यजमान कुंकळ्ळी युनियनने पंजाब पोलिसांचा ३-१ सेटमध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात पराभव करीत टाटा स्काय अखिल भारत व्हॉलीबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद प्राप्त केले. कुंकळ्ळी व्हॉलीबॉल कोर्टवर आयोजित या स्पर्धेच्या अंतिम लढतीत यजमानांनी पंजाब पोलिसांवर २५-२३, २९-३०, २५-२१, २५-२३ अशी मात केली.
कार्तिक व पप्पू धावस्करने कुंकळ्ळी युनियनतर्फे तर रणजितने पंजाब पोलिस संघातर्फे शानदार खेळाचे प्रदर्शन केले. तत्पूर्वी कुंकळ्ळी युनियनने बीपीसीएलचा तर पंजाब पोलिसांनी ओएजीसीवर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
दरम्यान, ओएजीसीने बीपीसीएलवर २५-१९, २५-२१, २५-२१ अशी मात करीत तृतीय स्थान पटकाविले. विजेत्यांना १ लाख रुपये व चषक, उपविजेत्यांना रु. ७५,००० व चषक तर ओएनजीसीला रु. ४०,०००चे बक्षीस प्राप्त झाले. बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो, कुंकळ्ळी पालिकेचे नगराध्यक्ष लॅविना मास्कारेन्हास, आयोजन समितीचे अध्यक्ष एल्विस गोम्म व गोवा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष इर्विन सुवारीस यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. कुंकळ्ळी युनियनचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी स्वागत व आभार प्रदर्शनाचे काम केले.