किमान वेतनाबाबत २ महिन्यांत निर्णय : मोन्सेरात

0
33

राज्यातील कुशल, अकुशल कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रश्‍नावर येत्या २ महिन्यांत निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना काल येथे दिली.

मळा येथे तलावाच्या बांधकामाच्या पाहणी केल्यानंतर मोन्सेरात यांनी कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रश्‍नावर बोलताना ही माहिती दिली. केरळ आणि नवी दिल्ली येथे कामगारांचा किमान पगार जास्त आहे. राज्यात मागील सहा वर्षात कुशल, अकुशल कामगारांच्या किमान पगारात वाढ केलेली नाही. केंद्र सरकारच्या १७ योजनांचा कामगारांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्ड उपलब्ध दिले जाईल, असेही ते म्हणाले.