काश्मीरात चकमकीत दोन जवान शहीद

0
96

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सुरक्षा दलांचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान उडालेल्या चकमकीत काल दोन जवान शहीद झाले. जवानांनी दिलेल्या प्रत्त्युत्तरात दोन दहशतवादीही ठार झाले.
पुलवामातील त्राल येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर त्यांना हुडकण्यासाठी दलांनी शोध मोहीम राबवली होती. काल सकाळी सुरू झालेल्या या चकमकी संध्याकाळी उशिरापर्यंत चालू होत्या. याच दरम्यान राज्य पोलीस दलाचा एक व एक लष्करी जवान असे दोन जवान शहीद झाले.