कारच्या धडकेत ४ गुरे ठार

0
101

भटक्या गुरांवर नियंत्रण नाहीच
गुरुवारी पहाटे भरधाव आलेल्या एका कारने चिंबल येथे जबरदस्त धडक दिल्याने चार गुरे ठार झाली. तर कार चालक जखमी झाला. तो सरकारी अधिकारी असून त्याच्यावर बांबोळी इस्पितळात उपचार चालू आहेत.
जुने गोवे पोलिसांनी गुन्हा नोंदवून अपघाताची चौकशी सुरू केली आहे. कदंब बायपास रस्त्याच्या चिंबल भागात रात्रीच्या वेळी अनेक भटकी गुरे असतात. या गुरांमुळे अपघात होतात. रस्त्यावरील गुरांना पकडण्याची पणजी महापालिकेची मोहीम सध्या थंडावली आहे.
विधानसभेत भटक्या गुरांच्या प्रश्‍नावर सत्ताधारी तसे विरोधी आमदार आवाज उठवितात. परंतु अद्याप तरी या प्रकारावर नियंत्रण आणणे कोणालाही शक्य झालेले नाही.