Home Featured काबूलहून आलेल्या ७८ पैकी १६ जणांना कोरोनाची बाधा

काबूलहून आलेल्या ७८ पैकी १६ जणांना कोरोनाची बाधा

0

मंगळवारी काबूलहून दिल्लीला आणण्यात आलेल्या ७८ निर्वासितांपैकी १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये गुरु ग्रंथ साहिब यांच्या तीन प्रती भारतात आणणार्‍या तीन शीख बांधवांचा समावेश आहे. संबंधित ७८ निर्वासितांना काबूलहून ताजिकिस्तानच्या दुशांबेमार्गे भारतात आणण्यात आले. या विमानातून ४४ अफगाण शीख बांधवांनाही भारतात आणले. त्यात १६ जण बाधित आढळले आहेत.

तालिबानसोबत भारत सरकार चर्चा करणार?
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर आता भारत सरकारची अधिकृत भूमिका काय असेल, याबाबत तर्क सुरू असतानाच भारत सरकार देशहित लक्षात घेऊन तालिबानसोबत चर्चा करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.