Home Featured काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा

काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा

0

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, अखिल भारतीय काँग्रेस समितीवरील विशेष निमंत्रित गिरीश चोडणकर, तसेच काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काल दिल्लीत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन गोव्यातील राजकीय स्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांनी गोव्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल गोव्यातील नेत्यांकडून इत्यंभूत माहिती मिळवली. तसेच आगामी 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वाढती बेरोजगारी, महागाई, खाण उद्योग, पर्यटन क्षेत्रातील समस्या, राज्यात सध्या चालू असलेली आंदोलने, पर्यावरणाचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आदी प्रश्न समजून घेऊन त्यावर सखोल चर्चा केली.
या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल हेही उपस्थित होते. बुथ पातळीवरील संघटन बळकट करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, आगामी निवडणुकांची रुपरेषा ठरवणे आदीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.