Home Featured काँग्रेसचे बालेकिल्ले घटक पक्षांना देणार नाही : पाटकर

काँग्रेसचे बालेकिल्ले घटक पक्षांना देणार नाही : पाटकर

0

आगामी गोवा विधानसभेसाठीच्या युतीच्या वेळी युतीतील कोणत्याही घटक पक्षांना काँग्रेस पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांवर आपला दावा करता येणार नाही, असे काल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांतून काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते ते मतदारसंघ, तसेच ज्या मतदारसंघांत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे असा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत घटक पक्षांसाठी सोडता येणार नाहीत, असे पाटकर म्हणाले.
ज्या मतदारसंघांत काँग्रेस पक्षाची स्थिती चांगली नाही तसेच ज्या मतदारसंघांत काँग्रेस पक्षाची स्थिती कमजोर आहे असेच मतदारसंघ युतीतील घटक पक्षांसाठी सोडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.