पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल व बी. साई प्रणिथ यांना कोरिया ओपन वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाहेरचा रस्ता धरावा लागला. पारुपल्ली कश्यपने तैवानच्या लू चिया हुंग याचा ४२ मिनिटांत २१-१६, २१-१६ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. महिला एकेरीत सिंधूला अमेरिकेच्या बीवन झांग हिने ७-२१, २४-२२, १५-२१ असे नमविले. दुखापतीमुळे सायना नेहवाल व प्रणिथ यांनी सामना अर्ध्यावरच सोडला. डेन्मार्कच्या पाचव्या मानांकित अँडर्स आंतोनसेन याच्याविरुद्ध घोट्याच्या दुखापतीमुळे प्रणिथने माघार घेतली. प्रणिथने सामना सोडला त्यावेळी अँडर्स २१-९, ११-७ असा आघाडीवर होता. तर माघारीवेळीदक्षिण कोरियाच्या किम गा ईयुन हिच्याविरुद्ध सायनाची स्थिती २१-१९, १८-२१, १-८ अशी होती. पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमिथ रेड्डी यांनादेखील पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. हुआंग काय शियांग व लियु सेंग या चीनच्या जोडीने भारतीयांवर २१-१६, १९-२१, २१-१८ असा विजय संपादन केला. सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी चौथ्या मानांकित ताकेशी कामुरा व केगो सोनाडा यांना कडवी झुंज देत २१-१९,