पणजी (प्रतिनिधी)
कळंगुट येथील समुद्र किनार्यावर बुडून इंदूर – मध्यप्रदेश येथील विश्वास आनंद नाईक (१९) या युवकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवार ११ ऑक्टोबरला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास बागा समुद्र किनार्यावर विश्वास नाईक याचा मृतदेह आढळून आला.
इंदूर येथील ८ जणांचा गट पर्यटनासाठी गोव्यात आला होता. गुरूवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास कळंगुट येथे समुद्रात उतरले. एका मोठ्या लाटेने तिघांना समुद्रात ओढले. त्यातील दोघेजण पाण्यातून बाहेर येण्यात यशस्वी झाले. मात्र, विश्वास हा युवक समुद्रात ओढला गेला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.