ओल्ड गोव्यात महिलेचा बलात्कार करून खून

0
83

पणजी (प्रतिनिधी)
गवंडाळी-ओल्ड गोवा पुलाजवळील हेलिपॅडजवळ एका २४ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांच्या १८ पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी काल दिली.
गवंडाळी धावजी ओल्ड गोवा येथे बुधवार १० ऑक्टोबरला सोनिया जयस्वाल नामक महिलेचा मृतदेह ओल्ड गोवा पोलिसांना आढळून आला होता. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये या महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ओल्ड गोवा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास कामाला सुरुवात केली आहे.