कळंगुट पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सात जणांना
अटक करून दोघा युवतींची सुटका केली आहे. अटक केलेल्यांमध्ये तीन दलाल आणि चार गिन्हाईकांचा समावेश आहे. पोलिसांनी आय २० कार, ९ मोबाईल संच आणि रोख ७० हजार रूपये जप्त केले आहेत.
कळंगुट पोलीस स्टेशनचे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. २७ सप्टेंबर २०१७ रोजी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. संतोष कुमार (ओरीसा), यामन अरोरा (हरयाणा), रिम बहादूर (नेपाळ) या तीन दलालाना अटक केली आहे. संतोष कुमार याला यापूर्वी कळंगुट आणि मडगाव पोलिसांनी सेक्स रॅकेट प्रकरणी अटक केलेली आहे. जॅबीन जॉन, सनी थॉमस, सी. जोसेफ आणि जोस पी या चार गिन्हाईकांचा समावेश आहे. चौघेही केरळ राज्यातील रहिवाशी आहेत. या हॉटेलचा परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांनी पंचायतीकडे अर्ज केला आहे. कळंगुट भागात रेक्स रॅकेट आणि अमली पदार्थाची अनेक प्रकरणे उजेडात येत आहेत. सुटका करण्यात आलेल्या मुलांची अपना घरमध्ये रवानगी करण्यात आली आहे.