कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतींची आत्महत्या

0
110

कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस. एल. धर्मगौडा (६४) यांनी आत्महत्या केली असून त्यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली एक चिठ्ठीही सापडली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. चिक्कामागलुरू जिल्ह्यातील कादूरजवळील एका रेल्वे रुळावर रात्री दोन वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक असल्याचे माजी पंतप्रधान व जेडीएसचे नेते एच. डी. देवगौडा यांनी म्हटले आहे. धर्मगौडा हे अलिकडेच चर्चेत आले होते.