कराटे स्पर्धेत ‘एसकेडीजे’चे धवल यश

0
183

पेडे म्हापसा येथे १९ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या दुसर्‍या आंतर दोजो कराटे अजिंक्यपद स्पर्धेत शोटोकन कराटे दो गोवा स्कूल ऑफ मार्शल आटर्‌‌स, सांतान तळावली व वडावड दोजो गोवाच्या विद्यार्थ्यांनी ७ सुवर्ण, ८ रौप्य व १९ कांस्यपदकांची कमाई केली. तसेच त्यांच्या मार्गदर्शक विशाखा आर्लेकर यांनीदेखील काता प्रकारात सोनेरी यश संपादन केले. पदक विजेते ः प्रमुख मार्गदर्शक विशाखा आर्लेकर (सुवर्ण काता), श्रेयानंदा आमोणकर (सुवर्ण कुमिते, कांस्य काता), राहुल वेर्णेकर (सुवर्ण कुमिते, कांस्य काता), आदिती आडपईकर (सुवर्ण कुमिते), वैष्णवी शिरवईकर (सुवर्ण कुमिते, कांस्य काता), शाहित वेर्णेकर (सुवर्ण, कुमिते), वेदांत नाईक (सुवर्ण कुमिते, रौप्य काता), कविता कुमारी (सुवर्ण, कुमिते), अमित मौर्य (कांस्य काता), पूजन फातर्पेकर (कांस्य काता), उद्देश कुर्टीकर (कांस्य काता), प्रणया सोलापुरकर (कांस्य काता), तनय वेर्णेकर (कांस्य कुमिते), भावेश वेर्णेकर (कांस्य काता), अमरजीत कुमार (रौप्य कुमिते, कांस्य काता), भाविशा वेर्णेकर (रौप्य कुमिते), रुपल केरकर (कांस्य काता व कुमिते), लोकेश सहानी (रौप्य कुमिते, कांस्य काता), रुद्रा नाईक (रौप्य कुमिते), रितिका साहनी (कांस्य कुमिते) तमन्ना नाईक (रौप्य काता, कांस्य कुमिते), गणराज नार्वेकर (कांस्य कुमिते), खुशी केरकर (रौप्य काता व कुमिते), गीतेेश गावस (कांस्य काता व कुमिते), चंदन गावस (रौप्य कुमिते, कांस्य काता).