कदंबच्या ताफ्यातील जुन्य बसगाड्या सेवेतून काढणार

0
61

कदंब महामंडळाच्या ताफ्यात तब्बल १२० एवढ्या जुन्या बसगाड्या असून १० वर्षापेक्षा जास्त काळापासून सेवेत असलेल्या ह्या गाड्या टप्प्याटप्प्याने सेवेतून काढून टाकण्यात येणार आहेत. या बसगाड्या सेवेतून काढून टाकल्यानंतर कदंब महामंडळ सुमारे १०० इलेक्ट्रिक बसेस विकत घेणार आहे. येत्या पाच वर्षाच्या काळात १२०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा कदंब महामंडळाचा प्रस्ताव आहे.

कदंब महामंडळाकडे सुमारे ३०० ते ३५० एवढ्या बसगाड्या आहेत. मात्र, त्यापैकी २५० बसगाड्याच सुस्थितीत असून त्या सेवेत आहेत. सध्या कदंबकडे ५० इलेक्ट्रिक बसेस आहेत. या ५० इलेक्ट्रिक बसेस महामंडळाने गेल्या वर्षी विकत घेतल्या होत्या. कदंब महामंडळाचे नवे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्या आदेशानुसार महामंडळाने जुन्या गाड्यांचा आढावा घेण्याचे काम हाती घेतले आहे.