शिवसेना नेत्यांनी मुंबईत पाय न ठेवण्याच्या दिलेल्या धमकीनंतर अभिनेत्री कंगना राणावत हिला काल केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला. कंगना हिला वाय प्लस सुरक्षा पुरविली जाईल असे केंद्रीय गृहमंत्रालयाने काल जाहीर केले.
कंगना हिने केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. आपण नऊ सप्टेंबरला मुंबईला येऊ असे तिने जाहीर केले असून तिच्या वडिलांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे तिला सुरक्षा पुरविण्यासाठी अर्ज केला होता. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही तिला सुरक्षा पुरविण्याची ग्वाही दिली आहे. ती हिमाचल प्रदेशची लेक आहे असे ते म्हणाले.