Home Featured औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात जाळपोळ, दगडफेक

औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात जाळपोळ, दगडफेक

0

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मागणीसाठी राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सोमवारी दोन गटात हिंसक हाणामारी झाली. सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरुन हे दोन्ही गट समोरासमोर आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. या घटनेत अनेक पोलिसही जखमी झाले. दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले आहे. नागपूरच्या महाल परिसरात तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.